हिंगोली शहरात कयाधू नदीच्यापुरात वाहून गेलेला शेख अरबाजशेख फेरोज (१८) या तरुणाचामृतदेह ४८ तासांनंतर रविवारीसकाळी आढळून आला.पोलिसांनी नागरिकांच्या मदतीनेमृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी शासकीयरुग्णालयात आणला. तसेचपरभणी जिल्ह्यातील खोरस येथील परमेश्वर खंडागळे (२५) याचाही मृतदेह रविवारी आढळला. हिंगोली शहरासह जिल्हाभरात शुक्रवारी जोरदार पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला होता. हिंगोली शहरालगत वाहणाऱ्या कयाधूनदीलाही मोठा पूर आला होता.शहरातील महादेववाडी भागातीलशेख अरबाज शेख फेरोज हा तरुणपूर पाहण्यासाठी गेला होता. यावेळीपाय घसरून तो पुराच्या पाण्यातपडला. परिसरात उपस्थितअसलेल्या नागरिकांना काहीकळण्याच्या आतच तो पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेला. या घटनेचीमाहिती मिळाल्यानंतर हिंगोलीग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षकश्यामकुमार डोंगरे यांच्या पथकानेघटनास्थळी पाहणी करूननागरिकांच्या मदतीने शोध सुरु केलाहोता. रविवारी सकाळी ११ वाजताशेख अरबाज याचा मृतदेह कयाधूनदीच्या पुलाजवळ आढळला. पाय घसरल्यामुळे दुर्घटना परभणीतील खोरस (ता.पालम)येथील परमेश्वर खंडागळे (२५) हातरुण शुक्रवारी लेंडी नदीत पायघसरून वाहून गेला होता. प्रशासन वग्रामस्थांनी दोन दिवस शोधघेतल्यानंतरत्याचा मृतदेह खोरस तेपेठ पिंपळगाव दरम्यान आढळला.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/Q9RW1he
पुरात वाहून गेलेल्या दोघा तरुणांचे मृतदेह सापडले:हिंगोली, परभणीतील दोघांचा 48 तासांनंतर शोध
August 31, 2025
0