मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी सरकारने सकारात्मक पाऊल उचलले आहे. त्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या संदर्भात एक मसुदा तयार करण्यात आला असून, तो कायद्याच्या चौकटीत राहून अंतिम केला जाईल, अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली. कायद्याच्या चौकटीत अंतिम केला जाणार मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी सरकारने सकारात्मक पाऊल उचलले आहे. त्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या संदर्भात एक मसुदा तयार करण्यात आला असून, तो कायद्याच्या चौकटीत राहून अंतिम केला जाईल, अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली. सरकार मराठा आरक्षणावर कायदेशीर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी महाधिवक्त्यांसोबत चर्चा सुरू आहे. आतापर्यंतचे सर्व न्यायालयीन निकाल लक्षात घेऊनच अंतिम निर्णय घेतला जाईल. हा अंतिम मसुदा मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांना दाखवला जाईल. त्यांची सहमती मिळाल्यानंतरच सरकार अंतिम निर्णय घेईल. हैदराबाद किंवा सातारा गॅझेट लागू केल्याने ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही, असेही विखे-पाटील यांनी स्पष्ट केले. आंदोलनाच्या नावाखाली जी काही लोक बाहेरून गोंधळ घालतात, सामान्य लोकांना त्रास देतात, जनतेला वेठीस धरतात, त्यांच्यावर कारवाई होणार आहे. ती कारवाई करावीच लागेल, -राधाकृष्ण विखे पाटील
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/tn8Bprh
आंदोलकांवर कारवाई:मराठा आरक्षणावर ‘गॅझेट’चा मसुदा तयार- विखे पाटील
September 01, 2025
0