स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित “जनसुरक्षा कायदाविरोधी संघर्ष समिती’च्या परिषदेत उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि न्यायव्यवस्थेवर जोरदार हल्ला चढवला. “आज लोकशाही सुप्रीम कोर्टाच्या दारात तडफडत आहे,’ अशी टीका त्यांनी केली. “दिवसाढवळ्या पक्ष फोडले जात असतानाही न्याय मिळत नाही. त्यामुळे लोकशाही वाचवण्यासाठी सरन्यायाधीशांनी लक्ष घालावे. माणूस वाचला, तर कुत्रेही वाचतील.पंतप्रधान चीनला जातात किंवा डोवाल रशियाला जातात, तेव्हा चालते, पण कुणी विरोध केल्यास त्याला डावे ठरवले जाते. हा दुटप्पी कारभार देशाला अराजकतेकडे घेऊन जाईल.मंत्र्यांच्या घरी रोकड सापडल्यावर कारवाई होत नाही, पण विरोधकांना मात्र अडकवले जाते, असा आरोप करत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर बोट ठेवले. लोकशाही वाचवण्यासाठी जनतेला दुसऱ्या स्वातंत्र्यसंग्रामासाठी सज्ज होण्याचे आवाहन केले. हुकूमशाहीकडे वाटचाल होतेय सरकार महत्त्वाच्या मुद्द्यांवरून लोकांचे लक्ष विचलित करत असल्याचा आरोपही ठाकरे यांनी केला. “कुणी कबुतरांच्या मागे लागतंय, कुणी कुत्र्यांच्या मागे,” असे म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. दिल्लीतील भटक्या कुत्र्यांच्या आणि माकडांच्या मुद्द्यावरून त्यांनी “रस्त्यावरचे कुत्रे पकडले तर झाडावरची माकडे खाली येतील, आणि ती माकडे संसदेत पोहोचली सुद्धा आहेत,” असा सणसणीत टोला लगावला. ही वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू असल्याचेही ते म्हणाले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/gdrLkIb
टीका:लोकशाही सुप्रीम कोर्टाच्या दारात आता तडफडत आहे- उद्धव ठाकरे
August 14, 2025
0