कोल्हापूरमधील सिद्धार्थनगरमध्ये साउंड सिस्टिममुळे दोन समाजात तेढ निर्माण झाले असून शुक्रवारी रात्री याचे रूपांतर दंगलीत झाले. त्यामुळे दोन गटात तुफान दगडफेक जाळपोळ आणि गाड्यांची तोडफोड झाली. सध्या कोल्हापुरातल्या सिद्धार्थनगर परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता आहे. सिद्धार्थनगर कमानीजवळ असणाऱ्या चौकात सिद्धार्थनगर आणि राजेबागस्वार येथील दोन गटात गेल्या अनेक दिवसांपासून वाद आहे. राजेबागस्वार फुटबॉल क्लबच्या ३१ व्या वर्धापन दिनानिमित्त फलक आणि साउंड सिस्टिम लावल्यावरून हा वाद सुरू झाला. यामुळे दुपारपासूनच या परिसरात तणाव निर्माण झाला होता. या परिसरात वर्चस्व कोणाचे? यावरून गेल्या अनेक दिवसांपासून या तरुणांमध्ये वाद असून यावरूनच ही घटना घडली असल्याचे सांगितले जाते. परिसरात शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता वाद उफाळून आला. त्यानंतर दोन गटातील नागरिकांनी एकमेकांवर तुफान दगडफेक करायला सुरुवात केली. तसेच काही तरुणांनी परिसरात उभ्या असलेल्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांचीदेखील तोडफोड केली. काहींनी वाहने पेटवून देण्याचा प्रयत्न केला. परिसरात बॅनर लावण्यावरून हा वाद झाला असल्याची माहिती समोर आली आहे. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून ते बॅनर उतरवले आहे. दोन्ही गटांकडून घोषणा परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने कोल्हापूर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात पोलिस कुमक मागवून जमावावर नियंत्रण मिळवले आहे. दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी होत असल्याने वाद अधिक वाढ होताना दिसत होता. त्यामुळे पोलिसांनी कुमक मागवली आणि जमाव पांगवला. शनिवारीही परिसरात तणावपूर्ण शांतता होती.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/BkHm9NA
साउंड सिस्टिममुळे कोल्हापूरमध्ये दंगल:दोन गटात तुफान दगडफेक, सध्या तणावपूर्ण शांतता
August 23, 2025
0