पुण्यातील कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रारदार मुलींनी पोलिसांवर केलेल्या मारहाण व जातीवाचक शिवीगाळीच्या गंभीर आरोप प्रकरणात आता दोन महत्त्वपूर्ण अहवाल समोर आले आहेत. हे अहवाल समोर आल्यानंतर प्रकरणात मोठी स्पष्टता निर्माण झाली असून, पोलिस प्रशासनाच्या भूमिकेला दिलासा मिळाल्याचे बोलले जात आहे. छत्रपती संभाजीनगर येथील एक 23 वर्षीय विवाहित महिला, पतीकडून वारंवार होणाऱ्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून पुण्यात आली होती. तिच्या मदतीसाठी आलेल्या तीन तरुणींना कोथरूड पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना न देता ताब्यात घेतल्याचा आरोप आहे. या तरुणींनी पोलिस ठाण्यात आपल्यावर मारहाण, जातीवाचक शिवीगाळ व लैंगिक अपमान झाल्याचा गंभीर आरोप केला होता. या प्रकरणात आता पोलिस चौकशी अहवाल आणि तरुणींचा वैद्यकीय अहवाल समोर आला आहे. वैद्यकीय अहवालात काय? या प्रकरणातील पीडित मुलींची 2 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 5.40 वाजता ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान संबंधित मुलींच्या शरीरावर कोणतीही ताजी दुखापत, मारहाणीचे जखमांचे चिन्ह किंवा इजा आढळून आलेली नाही, असे तपास करणाऱ्या डॉक्टरांनी वैद्यकीय अहवालात स्पष्ट नमूद केले आहे. पोलिस चौकशी अहवालात काय? पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या निर्देशानुसार, एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून याप्रकरणात पोलिसांकडून कोणता बेकायदेशीर प्रकार, जबाबदारीतील हलगर्जीपणा किंवा अधिकारांचा गैरवापर झाला का, याची चौकशी करण्यात आली. पोलिसांनी कार्यवाही कायदेशीर मार्गाने व नियमानुसार केली असल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले. तसेच मिसिंगची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित प्रकरणाचा तपास पूर्णपणे कायदेशीर मार्गाने आणि नियमानुसार केला होता, असेही चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांकडून बेकायदेशीर वर्तन किंवा जबाबदारीतील कसूर झाल्याचा कोणताही ठपका ठेवण्यात आलेला नाही. या प्रकरणाची नेमकी क्रोनोलॉजी काय?
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/8WHoIbC
कोथरूड प्रकरणात दोन महत्त्वाचे अहवाल समोर:पोलिसांची भूमिका कायदेशीर, पीडित मुलींच्या शरीरावर छोटी अथवा मोठी गंभीर इजा नसल्याचे स्पष्ट
August 06, 2025
0