मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस होता. मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातील लाखो मराठा समाजबांधव मुंबईत दाखल झाले आहेत. आपल्या न्याय्य हक्कासाठी ते मुंबईत शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत आहेत. मुंबईत दाखल झालेल्या हजारो आंदोलकांनी रात्री सीएसएमटी (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) रेल्वेस्थानकावर मुक्काम ठोकला आहे. दिवसभर विविध ठिकाणी आंदोलनात सहभागी झाल्यानंतर थकलेल्या आंदोलकांनी फलाट क्रमांक 3 आणि 4 वर आरामाची आणि झोपण्याची व्यवस्था केली आहे. आंदोलकांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढताना, दिवसभर शांततापूर्ण मार्गाने आंदोलन केले. त्यानंतर, आता त्यांनी रेल्वेस्थानकावरच आपले तात्पुरते निवासस्थान तयार केले आहे, जिथे ते एकत्र राहून पुढच्या वाटचालीची तयारी करत आहेत. फलाट क्रमांक 1 वर जेवणाच्या पंगती बसल्या असून, मुंबईतील मराठा बांधवांकडूनही मोठ्या प्रमाणात अन्नदान केले जात आहे. अनेक आंदोलकांनी झोपण्यासाठी टेंट आणले आहेत, जेणेकरून त्यांची गैरसोय होणार नाही. दिव्य मराठीचे रिपोर्टर प्रशांत कांबळे यांनी घेतला सीएसएमटी स्थानकावरील मराठा आंदोलकांच्या परिस्थितीचा आढावा, पाहा व्हिडिओ खाली पाहा मराठा आंदोलनाशी संबंधित आजचे फोटो...
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/1nDWoQT
मराठा आंदोलकांनी भरले CSMT स्थानक:दिवसभर आंदोलनात लढा, रात्री फलाटावर विश्रांती; पाहा दिव्य मराठी रिपोर्टरचा आढावा
August 30, 2025
0