Type Here to Get Search Results !

एसटीत 17,450 चालक, सहायकांची भरती होणार:8 हजार नवीन बस प्रवासी सेवेत येणार

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात सुमारे ८ हजार नवीन बसेस दाखल होणार आहेत. या बसेससाठी मनुष्यबळाची मोठी गरज लक्षात घेऊन एसटीत १७,४५० चालक, सहायकांची कंत्राटी पद्धतीने भरती होणार आहे. भरतीची ई-निविदा प्रक्रिया २ ऑक्टोबरपासून सुरू होईल, अशी माहिती परिवहन मंत्री - एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. या निर्णयाने हजारो तरुण-तरुणींना रोजगार मिळेल. निवडलेल्या उमेदवारांना किमान ३० हजार रुपये वेतन देण्यात येईल. याशिवाय आवश्यक प्रशिक्षणाची सोयही एसटीकडून करण्यात येणार आहे. एसटी महामंडळाच्या ३०० व्या संचालक मंडळ बैठकीतील या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार चालक व सहायक मनुष्यबळ कंत्राटी पद्धतीने तीन वर्षांच्या कालावधीसाठी घेण्यात येणार आहे. ई-निविदा प्रक्रिया विभागनिहाय राबवली जाणार आहे. निवडीनंतर आवश्यक मनुष्यबळ संबंधित संस्थांकडून वेळेत उपलब्ध करून दिले जाईल. राज्यातील प्रवाशांना अखंडित, सुरक्षित व दर्जेदार बससेवा देण्यासाठी हे मनुष्यबळ अत्यंत आवश्यक असल्याचे ते म्हणाले. विद्यापीठातील ७०० जागा भरू : पाटील राज्याच्या विविध विद्यापीठातील प्राध्यापकांच्या ७०० जागा भरण्यास सरकारने दाेन वर्षांपूर्वीच मान्यता दिली आहे. त्याची अंमलबजावणी लवकरच केली जाईल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नांदेड येथे दिली. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या २८ व्या दीक्षांत समारंभात शनिवारी त्यांनी हे आश्वासन दिले.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/OjJdbih

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.