भारत, हा विविध परंपरांनी नटलेला एक समृद्ध देश आहे. येथील संतांनी निसर्गाशी एकरूप होऊन जीवनाचे तत्त्वज्ञान घडवले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जैवविविधतेचे महत्त्व अधोरेखित केले. प्रसंगी स्वतःचे बलिदानही दिले. त्यापैकी एक थोर व्यक्तिमत्त्व म्हणजे अमृता देवी बिश्नोई... अमृता देवींनी आपले निसर्गप्रेम व बलिदान यातून पर्यावरण संरक्षणाचा अजरामर संदेश दिला. त्यांच्यामुळेच आज बिश्नोई समाजाची गावे हिरवळींनी फुललेली दिसतात. चला तर मग आज 'धुरंधर'मध्ये पाहूया अमृता देवी बिश्नोई यांच्या बलिदानाची मनाला चटका लावणारी कथा... बिश्नोई हा भारतातील पश्चिम थार वाळवंट आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये आढळणारा एक समुदाय आहे. गुरु जंभेश्वर हे या समुदायाचे संस्थापक आहेत. ते भगवान विष्णूचे अवतार मानले जातात. त्यावरून तयार झालेला 'विष्णोई' शब्द कालांतराने 'विश्नोई' व 'बिश्नोई' असा झाला. हा समाज जंभेश्वरांनी सांगितलेल्या 29 तत्वांचे पालन करतो. बीस (20) आणि नौ (9) म्हणजेच बिश्नोई असेही या संदर्भात मानले जाते. ती 11 सप्टेंबर 1730 ची सकाळ होती आता अमृता देवींच्या बलिदानाच्या कथेकडे वळू... जोधपूरपासून अवघ्या 18 किमी अंतरावर खेजरली नामक छोटेसे गाव आहे. इतर बिश्नोई गावांसारखेच हे गाव हिरवेगार व खेजरीच्या झाडांनी समृद्ध आहे. ती 11 सप्टेंबर 1730 ची सकाळ होती. संपूर्ण गाव शांत होते. पुरुष मंडळी शेतात गेली होती. तर महिला घरकामात मग्न होत्या. अमृता देवी बिश्नोई ह्या आपल्या आसू, रत्नी व भागू या 3 कोवळ्या मुलींसोबत सकाळचे सडा, सारवण व स्वयंपाक करण्यात व्यस्त होत्या. अचानक घोड्यांच्या टापांच्या आवाजाने ही शांतता भंग झाली. काही अनोळखी लोक गावात शिरले होते. त्यांच्या हातात भल्यामोठ्या कुऱ्हाडी होत्या. गावात हे कोण लोक आलेत? हे जाणून घेण्यासाठी अमृता देवी घराबाहेर आल्या. त्यांच्या मागे त्यांच्या मुलीही आल्या. त्यांना कळले की, ते राजाचे सैनिक आहेत. त्यांना खेजरीची झाडे तोडून जोधपूरच्या मेहरानगड किल्ल्यावर न्यायचे होते. अमृता बिश्नोईंच्या बलिदानाचा शहारे आणणारा प्रसंग याविषयी असे सांगितले जाते की, 1730 साली राजस्थानच्या मारवाडवर (आजचे जैसलमेर व जोधपूर) राणा अभयसिंह यांचे राज्य होते. त्यांनी आपल्या मेहरानगड किल्ल्यात 'फूल महल' नामक एक नवा राजवाडा बांधण्याचे काम हाती घेतले होते. या बांधकामासाठी चुना वापरण्यात येणार होता. त्यावेळी चुन्याला भट्टीत अतिउच्च तापमानात जाळून थंड चुना तयार करणे सर्वसामान्य गोष्ट होती. या चुन्याचा वापर नंतर बांधकामासाठी केला जात होता. चुन्याची भट्टी धगधगती ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात लाकडांची गरज भासणार होती. त्यामुळे अभयसिंह यांनी आपले मंत्री गिरधारी दास भंडारी यांना लाकडांचा अनिर्बंध पुरवठा सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते. राजाच्या आदेशानंतर गिरधारी दास यांची नजर किल्ल्यापासून अवघ्या 24 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या खेजरली गावावर पडली. ते आपल्या सैनिकांसह तिथे पोहोचले. त्यांनी गावातील दिसेल ते झाड तोडण्यास सुरूवात केली. पण वृक्षतोड विशेषतः खेजरीचे झाड तोडणे किंवा त्याला कोणत्याही प्रकारची इजा पोहोचवणे हे बिश्नोई समाजाच्या विरोधात होते. त्यामुळे रामोजी भादू यांच्या पत्नी अमृता देवी बिश्नोई व गावकऱ्यांनी त्यांचा कडाडून विरोध केला. बिश्नोई समाजाच्या रुढी व परंपरांचा दाखला देत त्यांनी सैनिकांना झाडे न तोडण्याची विनंती केली. पण सैनिकांनी त्यांची विनंती धुडकावली. ते झाड तोडण्यासाठी पुढे सरसावले. हे पाहून अमृता देवींनी झाडाला मिठी मारली आणि डोळे मिटून घेतले. 'सर साठे रुख रहे, तो भी सस्तो जाण' अर्थात 'झाडांसाठी स्वत:च्या प्राणांची आहुती द्यावी लागेल तरी द्यावी', असे म्हणत त्यांनी सैनिकांना 'झाड तोडण्यापूर्वी तुम्हाला माझा जीव घ्यावा लागेल' असे ललकारले. त्यांचे हे रूप पाहून सैनिक काहीसे थबकले. त्यांनी अमृता देवींना झाडापासून दूर होण्याचा इशारा दिला. पण अमृता देवी कणभरही जागेवरून हलल्या नाही. त्यामुळे राजाची आज्ञा शिरसांवद्य मानत सैनिकांनी काही क्षणांतच धारदार कुऱ्हाडीने त्यांचे शीर धडापासून वेगळे केले. हे दृश्य पाहून अमृता देवींच्या तिन्ही मुली संतापल्या. त्यांनीही आपल्या आईसारखी झाडांना मिठी मारली. सैनिकांनी त्यांनाही अत्यंत निर्दयीपणे ठार मारले. या घटनेचा शाही सैनिकांवर कोणताही परिणाम पडला नाही. त्यांनी नव्या जोमाने आपले काम सुरू ठेवले. ही बातमी लगतच्या गावांत वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर 83 गावांतील बिश्नोई लोक खेजरली येथे गोळा झाले. त्यांनी परिषद घेतली. त्यात खेजरीच्या एका झाडासाठी एक बिश्नोई स्वयंसेवक आपले बलिदान देईल असा ठराव घेतला. त्यानुसार जवळपास 363 जणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. यात तब्बल 111 महिलांचा समावेश होता. ही गोष्ट नंतर राणा अभयसिंह यांच्या कानावर गेली. त्यांनी तत्काळ झाडे तोडण्यावर बंदी घातली. तसेच बिश्नोई समाजाच्या नागरिकांच्या बलिदानाचा सन्मान करत त्यांची माफी मागितली. त्यांनी ताम्रपटावर कोरलेला एक आदेश जारी केला. या आदेशाद्वारे बिश्नोई गावे व लगतच्या परिसरात वृक्षतोड व प्राण्यांची शिकार करण्यावर बंदी घालण्यात आली. हे संरक्षण आजही कायम आहे. बिश्नोई समाज आजही आपल्या जैवविविधतेचे संरक्षण करतात. बिश्नोई समाजात असणारे खेजरी वृक्षाचे महत्त्व बिश्नोई समुदायात खेजरी नामक वृक्षाला मोठे महत्त्व आहे. हे झाड अत्यंत खडतर हवामानातही तग धरते. त्यामुळे त्याला वाळवंटातील कल्पवृक्ष म्हटले जाते. बिश्नोई गावे खेजरीच्या झाडांनी वेढलेली अन् बहरलेली असतात. त्यामुळे त्यांचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. बिश्नोई समाजाच्या जीवनात खेजरी वृक्षाचे एक विशेष स्थान आहे. त्यामुळे त्याच्या फांद्या तोडण्यास किंवा छाटण्यास मनाई आहे. हे लहान सदाहरित झाड थार वाळवंटाची जीवनरेषा मानली जाते. ते सावली देते. बिश्नोई समाजाच्या जीवनात खेजरी वृक्षाचे एक विशेष स्थान आहे. त्यामुळे त्याच्या फांद्या तोडण्यास किंवा छाटण्यास मनाई आहे. हे लहान सदाहरित झाड थार वाळवंटाची जीवनरेषा मानली जाते. ते सावली देते. त्याची पाने उंट, शेळ्या, गुरेढोरे व इतर प्राण्यांना चारा पुरवतात. त्याची फळे खाण्यायोग्य असतात. तर मुळे वातावरणातील नायट्रोजन स्थिर करण्यास मदत करतात. यामुळे माती सुपीक बनते. त्यामुळेच खेजरी वाळवंटाची अर्थव्यवस्था व पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. वैदिक काळापासून शमी म्हणून पूजल्या जाणाऱ्या या झाडाचा उल्लेख रामायण व महाभारत या दोन्हीमध्ये आढळतो. अमृता देवींचे बलिदान बिश्नोईंच्या पूर्ण अहिंसेचे प्रतिक अमृता देवी व त्यांच्या सहकाऱ्यांचे बलिदान बिश्नोई समाजाच्या पूर्ण अहिंसेचे प्रतिक होते. या समाजासाठी प्रत्येक वनस्पती ही चालत्या फिरत्या सजिवांसारखीच आहे. त्यामुळे ते त्यांचे प्राणपणाने संरक्षण करतात. यामुळेच बिश्नोईंना भारताचे पहिले पर्यावरणवादी म्हणून ओळखले जाते. खेजरलीच्या घटनेनंतर जवळपास 230 वर्षांनी 1973 साली टिहरी - गढवाल चिपको आंदोलन झाले. त्यानंतर बिहार व झारखंड राज्यात जंगल बचाओ आंदोलन (1982), कर्नाटकच्या पश्चिम घाटात अप्पिको चालुवली (1983) व इतर आंदोलने झाली. या सर्व आंदोलनांचे उद्दीष्ट पर्यावरण संवर्धन व जतन हेच होते. या आंदोलनांमुळे भारत सरकारला आपल्या सार्वजनिक धोरणांमध्ये अमुलाग्र बदल करावे लागले. चिपको आंदोलनातील झाडांना मिठी मारण्याची रणनीती व त्याच्या संदेशाला भारताबाहेरही अमाप लोकप्रियता मिळाली. याच धर्तीवर नंतर स्वित्झर्लंड, जपान, मलेशिया, फिलीपिन्स, इंडोनेशिया व थायलंडमध्ये निदर्शने झाली. अमृता देवी यांचे बलिदान केवळ बिश्नोई समाजापुरते मर्यादित नव्हते. त्यांच्या बलिदानामुळे संपूर्ण जगाला पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व पटले. त्यातून पर्यावरण संरक्षणाची एक नवी चळवळ उभी राहिली. यात चिपको आंदोलनासारख्या अनेक पर्यावरणीय चळवळींचा समावेश आहे. त्यामुळे बिश्नोई समाजाच्या पर्यावरणप्रेमी तत्त्वांचे मूर्त स्वरूप म्हणून अमृता देवी यांचे नाव आजही आदराने घेतले जाते. कोण आहेत बिश्नोई समाजाचे संस्थापक? गुरु जंभेश्वर महाराज हे बिश्नोई समाजाचे संस्थापक आहेत. त्यांना जंभोजी नावानेही ओळखले जाते. त्यांनी बिश्नोई समाजाची स्थापना केली. त्यांचा जन्म राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील पापसर गावच्या एका जाट शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लोहट पंवार (पनवार) व आईचे नाव हंसादेवी असे होते. जंभोजींना बालपणापासूनच धर्म व अध्यात्मात रस होता. जंभेश्वर महाराजांविषयी असे सांगितले जाते की, त्यांना लहानपणी मुके म्हटले जात होते. कारण, ते सलग 7 वर्षे एकही शब्द बोलले नव्हते. या कालावधीत त्यांनी मौन धारण केल्याचे मानले जाते. जंभेश्वरांनी वयाच्या 27 वर्षांपर्यंत गोपालक म्हणून काम केले. सुरुवातीपासूनच त्यांचे निसर्ग व पशू पक्षांवर अपार प्रेम होते. ते झाडे तोडणे व प्राण्यांची हत्या करणे गंभीर पाप मानत होते. त्यांचे संपूर्ण आयुष्य वनसंपदा व वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी समर्पित होते. त्यांनी लोकांना फक्त शाकाहारी अन्न सेवन करण्यास प्रोत्साहित केले. त्यामुळे जंभेश्वरांना पर्यावरण संवर्धनाचे प्रणेतेही मानले जाते. आजही बिश्नोई समुदाय पर्यावरण संरक्षणासाठी तेवढाच समर्पित आढळतो. संत जंभेश्वरांनी 1485 साली वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी बिश्नोई पंथाची स्थापना केली. त्यांनी आपल्या अनुयायांना निसर्ग व सर्व सजीव प्राण्यांविषयी प्रेमभावना जपण्याचा उपदेश दिला. त्यांनी बिश्नोई समाजासाठी 29 नियमांची आचारसंहिता तयार केली. त्याचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले. या 29 नियमांपैकी 9 नियम हे प्राणी संरक्षण, 7 नियम समाज रक्षण, 10 नियम व्यक्तींची सुरक्षितता व चांगल्या आरोग्यासाठी आणि उर्वरित नियम हे आध्यात्मिक उन्नतीसाठी आहेत. बिश्नोई धर्माचे अनुयायी या 29 तत्वांचे कसोशीने पालन करतात. अमृता देवी बिश्नोई यांनी व इतर 363 बिश्नोईंनी खेजरी वृक्षांसाठी दिलेले बलिदान ते आजही सर्वोतपरी मानतात. मुन्शी हरदयाल यांनी बिश्नोई समाजावर एक पुस्तक लिहिले आहे. त्यात ते सांगतात, बिश्नोई समाजाचे संस्थापक जंभेश्वर पंवार राजपूत होते. 1487 साली या प्रदेशात प्रचंड दुष्काळ पडला. त्यावेळी जंभेश्वरांनी जनसेवेला प्राधान्य दिले. त्यावेळी जाट समुदायाच्या अनेक समर्थकांनी जंभेश्वरांचे कार्य पाहून बिश्नोई धर्म स्वीकारला होता. बिश्नोई समाजाचे अनुयायी जंभेश्वरांना विष्णूचा अवतार मानतात. जंभेश्वरांनी सांगितलेल्या 29 तत्वांचे हा समाज पालन करतो. बीस (20) आणि नौ (9) म्हणजेच बिश्नोई असे मानले जाते. अमृता देवींची कथा आजही प्रासंगिक अमृता देवी यांचे बलिदान आजच्या पिढीला निसर्गाशी मित्रवत संबंध ठेवण्याची व पर्यावरणाच्या संरक्षणासाठी लढण्याची प्रेरणा देते. त्यामुळे सरकारने त्यांच्या सन्मानार्थ 'अमृता देवी बिश्नोई वन्यजीव संरक्षण पुरस्कार' सुरू केला. हा पुरस्कार दरवर्षी पर्यावरण रक्षणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. खेजरली येथील त्यांच्या बलिदानाचे स्मारक आजही लोकांना निसर्गप्रेम व त्यासाठी त्याग करण्याची प्रेरणा देते. सामान्य माणूसही असामान्य धैर्य व समर्पणाने इतिहास घडवू शकतो हे अमृता देवींच्या जीवनकथेतून दिसून येते. त्यामुळे त्यांचे नाव बिश्नोई समाजाचे गौरवशाली प्रतीक मानले जाते. अमृता देवी यांच्या सन्मानार्थ दरवर्षी खेजरली येथे एका मेळ्याचे आयोजन केले जाते. निसर्गाला जपण्यासाठी जीवन अर्पण करणाऱ्या आपल्या पूर्वजांना आदरांजली वाहण्यासाठी बिष्णोई समाजाचे लोक खेजर्लीमध्ये एकत्र येतात. निसर्गसंवर्धनाचा वसा नव्या पिढीकडे सोपवणे हाच या मेळ्याचा खरा उद्देश असतो. बिश्नोई समाज पर्यावरण अन् प्राणी संरक्षणात आघाडीवर बिश्नोई समाज हा पूर्णतः शाकाहारी आहे. वन्यजीव संवर्धनात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. या समुदायाचे बहुतांश सदस्य हे शेतकरी आहेत. ते पशुपालन करतात. त्यांनी अखिल भारतीय जीवन रक्षा बिश्नोई महासभेची स्थापना केली. वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी बिश्नोई टायगर फोर्सचीही स्थापना केली. ही संघटना वन्यजीवांच्या शिकारीच्या घटना रोखण्यासाठी अहोरात्र काम करते. बिश्नोई गावांलगत खेजरीच्या झाडांसह हरणेही आढळतात. बिश्नोई समुदाय हरणांना खेजरीच्या झाडांएवढेच पवित्र मानतो. बिश्नोई समुदायाचा असा विश्वास आहे की, ते त्यांच्या पुढील जन्मात हरणाचे रूप धारण करतील. बिश्नोई समुदायात असेही मानले जाते की, गुरु जंभेश्वरांनी त्यांच्या अनुयायांना काळवीटाला आपला अवतार मानून त्याची पूजा करण्याची सूचना केली होती. म्हणूनच काळवीट शिकार प्रकरणात अडकलेला अभिनेता सलमान खान लॉरेन्स बिश्नोईच्या रडारवर आहे. धुरंधर मालिकेतील खालील स्टोरीज वाचा... धुरंधर-42; दगडाबाई शेळके:स्वतःच्या नवऱ्याचे दुसरे लग्न लावून मराठवाडा मुक्तिसंग्रामात स्वतःला झोकून देणारी जालन्याची 'झाशीची राणी' धुरंधर-41; यशवंत घाडगे:दुसऱ्या महायुद्धात मर्दुमकी दाखवत ब्रिटिशांकडून इटलीच्या सैनिकांना कंठस्नान घालणारा मराठी सैनिक धुरंधर-40; शाहीर अमर शेख:धग, रग, आग, धुंदी अन् बेहोशीची जिवंत बेरीज असणारा तथा 'बर्फ पेटला हिमालयाला विझवायला चला' म्हणणारा शाहीर धुरंधर-39; टी. एन. शेषन:'नेत्यांना नाश्त्यात खाणारे' तथा EC ला अभूतपूर्व ताकद अन् प्रतिष्ठा मिळवून देणारे भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त धुरंधर-38; डॉ. एम एस स्वामीनाथन:उपासमारीच्या सावटाखाली झुरणाऱ्या भारताला स्वावलंबनाचे स्वप्न दाखवून ते सत्यात उतरवणारा शास्त्रज्ञ धुरंधर-37; मेजर शैतान सिंह:1962 च्या भारत - चीन युद्धात 120 जवानांच्या जोरावर शत्रूचा फडशा पाडणारा अन् पोट फाटले तरी मैदान न सोडणारा बहाद्दर धुरंधर-36; राणी वेलू नाचियार:महिलांची फौज तयार करून ईस्ट इंडिया कंपनीच्या सैनिकांना पहिल्यांदा धूळ चारणारी शिवगंगाची 'वीर मंगई' धुरंधर-35; अय्यनकाली:महिलांना छाती झाकण्याची परवानगी मिळवून देणारा अन् दलितांनी पिकवलेले धान्य चालते, मग ते का चालत नाहीत? असा प्रश्न करणारा सुधारक धुरंधर-34; जगन्नाथ शंकरशेठ:लोकांचा विश्वास जिंकणारी श्रीमंती गरिबांवर उधळणारा अन् परकियांनाही आपला वाटणारा मुंबईचा खरा शिल्पकार धुरंधर-33; अण्णाभाऊ साठे:दीड दिवस शाळेत जाऊन साहित्याचा सूर्य झालेला लोकशाहीर; जात, धन अन् धर्मदांडग्यांना आव्हान देणारा अण्णा धुरंधर-32; धीरूभाई अंबानी:गरिबीवर मात करत कोट्यवधी भारतीयांना मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा देणारे भारताचे एक अप्रतिम उद्योग रत्न धुरंधर-31; राजर्षी शाहू महाराज:अस्पृश्याला मानाचे पान अन् नांगरासाठी तोफा वितळवून लोखंड देणारे शाहू महाराज ग्रेट का होते? धुरंधर-30; चे गेव्हारा:अन्यायाविरोधात लढण्याची जिद्द जागवून अवघ्या जगातील क्रांतीचा चेहरा बनलेला तुमच्या 'T शर्ट'वरील क्रांतिदूत धुरंधर-29; संत कबीर:पैशांच्या मागे पळणाऱ्यांचा देव कसा? असा परखड सवाल करत समस्त मानवतेला साधेपणाचा संदेश देणारा महानायक धुरंधर-28; राणी चेन्नम्मा:स्वकियांची फंदफितुरी जमिनीत गाडून 1857 च्या सशस्त्र उठावापूर्वी इंग्रजांना धूळ चारणारी 'कर्नाटकची लक्ष्मीबाई' धुरंधर-27; अहिल्याबाई होळकर:न्यायबुद्धीने स्वतःच्या नवऱ्याला धारेवर धरत चोराच्याही पोटाचा प्रश्न सोडवणाऱ्या दूरदृष्टीच्या शासक धुरंधर-26; डॉ. जयंत नारळीकर:ब्रह्मास्त्र होते तर रामाच्या राज्यात वीज होती का? असा झोंबणारा प्रश्न करणारा भारताचा मराठमोळा शास्त्रज्ञ धुरंधर-25; मुथुलक्ष्मी रेड्डी:महिला हक्क अन् आईचे 'देवदासी'पण पाहून त्याविरोधात लढा पुकारणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला आमदार धुरंधर-24; कुलदीपसिंग चांदपुरी:पाकच्या 2000 हून अधिक सैनिकांना 120 जवानांच्या बळावर धूळ चारणारा लढवय्या; '1971' ची अमर गाथा धुरंधर-23; चंद्रप्रभा सैकियानी:पडदा प्रथेवर लाथ घालून महिलांना आभाळ खुले करणारी आसामची हिरकणी; कुमारी माता झाली तरी डगमगली नाही धुरंधर-22; कर्मवीर भाऊराव पायगौंडा पाटील:महाराष्ट्राच्या मातीत शिक्षणाचा सूर्य पेरून उपेक्षितांच्या झोपडीत ज्ञानाचे पीक काढणारा खरा 'धुरंधर' धुरंधर-21; प्रबोधनकार ठाकरे:मराठी समाज मनात मोक्याच्या ठिकाणी पक्क्या गाठी मारून जातिभेदांच्या जखमांचा खोलवर शोध घेणारा बहुजन हिंदुत्त्ववादी धुरंधर-20; भीमराव रामजी आंबेडकर:चवदार तळ्याला ताळ्यावर आणणारा दलितोद्धारक अन् सामाजिक समरसतेचा खरा विवेकी शिल्पकार धुरंधर-19; जिगर मुरादाबादी:'शराब पीने दे मस्जिद में बैठ कर, या वो जगह बता जहाँ खुदा नहीं,' असे म्हणत मौलवींकडून टाळ्या पिटवून घेणारा सूफी शायर धुरंधर-18; आनंदीबाई जोशी:'पृथ्वीच्या पाठीवर हिंदुस्तान इतका दुसरा रानटी देश नाही', असे ठणकावून सांगणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर धुरंधर-17; भगतसिंग:'बॉम्ब अन् पिस्तुले क्रांती आणत नाहीत, क्रांती लोकांच्या मनात जन्मते', असे ठामपणे सांगणारा 'शहीद ए आझम' धुरंधर-16; शहाजीराजे भोसले:छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या संकल्पनेचे प्रेरणास्थान अन् बृहन्महाराष्ट्राची स्थापना करणारा धोरणी राजा धुरंधर-15; ई. व्ही. रामासामी:देव आहे हे सिद्ध करण्याचे आव्हान देत तर्कशुद्ध अन् निर्भय मतांद्वारे समाजात क्रांती घडवणारा भारताचा 'पेरियार' धुरंधर-14; कार्नेलिया सोराबजी:रूढी परंपरांना आव्हान देत शिक्षण, समानता अन् मानवी हक्कांसाठी अथक झगडणारी भारताची पहिली महिला बॅरिस्टर धुरंधर-13; खासेराव जाधव:बहुजन समाजाच्या खांद्यावरील निरक्षरतेचे 'जू' काढून त्यांना उच्च शिक्षणाच्या गंगेचे पाणी पाजणारा अवलिया धुरंधर-12; तंट्या भिल्ल:आदिवासींमध्ये राष्ट्रीयत्व जागवणारा 'रॉबिनहूड', थोर स्वातंत्र्यसैनिक; वाचा स्वातंत्र्य लढ्यातील संघर्षाचे सोनेरी पान धुरंधर-11; विठ्ठल सखाराम पागे:उकिरड्याला खरकटे माहिती नसल्याच्या काळात 'भूकबळी'वर नामी उपाय शोधणारा राजकारणी धुरंधर-10; मोहन हिराबाई हिरालाल:विनोबा भावेंचे 'सर्वायतन' नक्षलग्रस्त गडचिरोलीत रुजवणारा अन् गरिबांना लक्ष्मीदर्शन घडवणारा अवलिया धुरंधर-9; फातिमा शेख:सावित्रीमाईंची मैत्रीण अन् भारताची पहिली मुस्लिम शिक्षिका; फातिमा एक काल्पनिक पात्र होत्या का? तुम्हीच ठरवा धुरंधर-8; एकनाथ दगडू आवाड:बापाचा बुचडा कापून 'पोतराज' प्रथेवर घाव घालणारा पोरगा; कथित गुन्हेगारीने बदनाम झालेल्या बीडचा थोर माणूस धुरंधर-7; स्वामी विवेकानंद:मानवतेचा उत्कृष्ट प्रेमी, महान निधर्मी तत्ववेत्ता; नरेंद्रनाथ दत्त यांचे अखेरचे काही तास कसे होते? धुरंधर-6; कंदुकुरी वीरेशलिंगम पंथुलु:अंधश्रद्धेवर लाथ घालून विधवा पुनर्विवाह अन् ज्ञानाची वात पेटवणारा आंध्रचा 'लेखणी'सम्राट धुरंधर-5; भाऊराव कृष्णराव गायकवाड ऊर्फ दादासाहेब गायकवाड:दोन वेळा वाचवले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राण धुरंधर-4; डॉ. विश्राम रामजी घोले:महिला उत्थानासाठी पेटून उठलेला सुधारक, ज्यांची 'बाहुली' ठरली स्त्री शिक्षणाची पहिली बळी धुरंधर-3; पार्वतीबाई आठवले:वैधव्य अन् परावलंबन दैवी भोग मानणारी, पण पोटच्या गोळ्याच्या काळजीने असामान्य झालेली एक निरक्षर स्त्री धुरंधर-2; बसव प्रेमानंद:अंधश्रद्धेच्या खाटेवर आजारी पडलेल्या समाजाला विज्ञानाचे औषध देऊन चमत्कारांची पुरती हवा काढणारा थोर दार्शनिक धुरंधर-1; नरहर अंबादास कुरुंदकर:विचारांची श्रीमंती वाढवणारा अन् आजच्या किर्र वैचारिक काळोखात प्रकाशवाट दाखवणारा थोर विचारवंत
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/RNJEWjz
धुरंधर; अमृता देवी बिश्नोई:वाळवंटातील खेजरीचे एक झाड वाचवण्यासाठी स्वतःच्या 3 कोवळ्या मुलींसह बलिदान देणारी धाडसी माता
September 20, 2025
0