Type Here to Get Search Results !

दसरा मेळाव्याला ठाकरे विरुद्ध शिंदेंचा मुकाबला:3 वर्षांपासून दोन्ही शिवसेनेचे 2 वेगवेगळे मेळावे

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. शिवसेनेच्या बंडानंतर मुंबई महापालिकेची पहिलीच निवडणूक होत आहे. त्यामुळे राजकीय पक्ष निवडणुकीपूर्वी होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या तयारीला लागले आहेत. निवडणुकीमुळे यंदाच्या दसरा मेळाव्याला राजकीय रंग चढणार आहे. २०२२ मध्ये एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेचे विभाजन झाले. ठाकरेंची सेना आणि शिंदेंची सेना असे दाेन वेगळे पक्ष झाल्याने, गेल्या ३ वर्षांपासून मुंबईत दोन्ही शिवसेनेचे दोन वेगवेगळे दसरा मेळावे होऊ लागले. राज्यातील शिवसैनिक दसरा मेळाव्याची वाट पाहत असतात. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी दोन्ही सेनांमध्ये संघर्ष झाला होता. दोन गटांतील वाद न्यायालयात पोहोचला. अखेर न्यायालयीन लढाईनंतर ठाकरे गटाला परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे उद्धवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होत आहे. यंदाच्या वर्षीही मुंबई महापालिकेने उद्धवसेनेला परवानगी दिली आहे. शिवाजी पार्कवर होणारा ५९ वा दसरा मेळावा आहे. तर, दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सेनेचा चौथा दसरा मेळावा आझाद मैदान येथे होत आहे. यंदाच्या वर्षी महापालिका निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्यामुळे दसरा मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे दोन्ही गटांसाठी हा मेळावा ताकद दाखवण्याची आणि कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्याची संधी मानली जात आहे. त्यामुळे मेळाव्याच्या तयारीसाठी दोन्ही गटांनी कंबर कसली असल्याचे दिसून येत आहे. राजकीय स्थिती अशी महापालिकेवर आतापर्यंत सेनेची सत्ता राहिली आहे. २०१७ मध्ये शिवसेना आणि भाजपने युती न करता स्वबळावर निवडणूक लढवली होती. या वेळी शिवसेनेला ८४ तर भाजपला ८२ जागा मिळाल्या. आता राजकीय परिस्थिती बदली असून शिवसेनेत दोन गट पडले आहेत. उद्धवसेना महाविकास आघाडीसोबत तर शिंदेंची सेना महायुतीसोबत आहे. उद्धवसेनेतील ६० हून अधिक माजी नगरसेवकांनी शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे शिंदेसेनेकडूनही मोर्चबांधणी सुरू आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/9aNbMWg

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.