Type Here to Get Search Results !

गणेशोत्सवात आरोग्य शिबिरांना मोठा प्रतिसाद:जिल्ह्यात 308 शिबिरांमध्ये 16 हजारांहून अधिक नागरिकांची तपासणी

गणेशोत्सावाच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यात ३०८ ठिकाणी आरोग्य शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांमधून १६ हजार ६२१ जणांची तपासणी करण्यात आली असून ५८३ जणांनी रक्तदान केले. यावर्षीच्या गणेशोत्सवाला शासनाने राज्योत्सवाचा दर्जा देत ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम राबविण्याचे ठरविले होते. त्यानुषंगाने अनेक मंडळांनी आरोग्य तपासणी शिबीरे आणि रक्तदान शिबिरांचे आयोजन केले होते. त्यानुसार जिल्ह्यात ३०८ ठिकाणी आरोग्य तपासणी तर काही मंडळांनी याच शिबिरांना जोडून रक्तदान शिबिरांचे आयोजन केले होते. प्रशासकीय यंत्रणेमार्फत गोळा करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार आरोग्य तपासणी शिबिरांतून १६ हजार २१९ नागरिकांना आरोग्य तपासणी व उपचाराचा लाभ मिळाला. यामध्ये ७ हजार ९१५ पुरुष, ७ हजार ३८० महिला व ९२४ बालकांचा समावेश आहे. ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या विशेष उपक्रमाला मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षासोबत जोडण्यात आले होते. त्यामुळे दुर्धर आजार असलेल्यांना यापुढच्या उपचारांसाठी आर्थिक सहाय्यसुद्धा केले जाणार आहे. श्रीगणेशा आरोग्याचा अंतर्गत शहरी व ग्रामीण भागातील गणेश मंडळांच्या ठिकाणीच आरोग्य तपासणी व उपचार शिबिरे घेण्यात आली. त्यासाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनात निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, अधीक्षक डॉ. निलेश खटके, धर्मदाय सहआयुक्त दीपक खोचे, धर्मदाय उपायुक्त राजेश इंगोले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, सुपरस्पेशालिटी हॉस्पीटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे, महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल काळे तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे अध्यक्ष डॉ. श्याम गावंडे, पवन गुल्हाने व मंगेश बांबटकर यांनी सक्रीय मदत केली. १३० मंडळांमध्ये जनजागृती शिबिरे शासनाच्या आवाहनानुसार जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांनी आरोग्य विषयक जनजागृतीसाठीदेखील सहभाग नोंदवला. ‘अनुलोम’ संस्थेने जिल्ह्यातील १४ तालुक्यातील ग्रामीण भागात १३० गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन ९ हजार १०० नागरिकांमध्ये आरोग्य विषयक जनजागृती केली.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/JhlqDts

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.