थेट मंत्रालयातील दालनातच बोगस नोकरीसाठी मुलाखती घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कनिष्ठ लिपिक पदाची नोकरी देण्याच्या नावाखाली सात आरोपींनी एका तरुणाची ९ लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, एक महिलेसह तिघे पसार आहेत. नागपूरमधील जरीपटका येथील राहुल तायडे यांना त्याचा मित्र लॉरेन्स हेनरी (४५, रा. नागपूर) याने मंत्रालयात नोकरीचे आश्वासन दिले. यासाठी त्याने टप्प्याटप्प्याने ९ लाख ५५ हजार रुपये घेतले. आरोपींनी थेट मंत्रालयातील ‘शिल्पा उदापुरे’ या नावाची पाटी लावलेल्या दालनात तायडे यांची मुलाखतही घेतली. २०१९ पासून चालढकल, आता उघडकीस आरोपींनी २०१९ मध्ये पैसे घेऊनही तायडे यांना नियुक्ती पत्र दिले नाही. सतत पाठपुरावा केल्यानंतर मंत्रालय प्रवेशासाठी ओळखपत्र दिले. मात्र, अनेक दिवस उलटूनही नोकरी मिळाली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तायडे यांनी हुडकेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गेल्या आठवड्यात आरोपी लॉरेन्स हेनरीला मुंबईतून अटक केली. या प्रकरणातील शिल्पा उदापुरे, वसंतकुमार उदापुरे, विजय पाटनकर, नितीन साठे, सचिन डोळस व बाबर नावाचा शिपाई अद्यापही फरार आहेत. सर्व प्रकरणाची माहिती फसवणूक झालेल्या राहुल तायडे यांनी दिली.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/ODk2tjs
बोगस नोकरीसाठी थेट मंत्रालयातील दालनात मुलाखत; 9.50 लाखांचा गंडा:एका आरोपीस अटक, महिलेसह तिघे पसार
September 09, 2025
0