सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील कला केंद्राच्या प्रकरणाची चर्चा ताजी असतानाच, आता माढा तालुक्यातील वेणेगाव येथील जय मल्हार कला केंद्राबाहेर गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एका व्यक्तीच्या पायाला गोळी लागून तो गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे. एकच बैठक लावण्यावरून झालेल्या वादातून ही घडली घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, देवा बाळू कोठावळे (रा. वाखरी, पंढरपूर) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. एकाच ठिकाणी बसण्याच्या (बैठक लावण्याच्या) कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला. या वादाने इतके गंभीर स्वरूप धारण केले की, एका गटाने दुसऱ्या गटातील देवा कोठावळे यांच्यावर पिस्तूलमधून गोळीबार केला. ही गोळी त्याच्या डाव्या पायाच्या मांडीला लागली, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. या वादात सहभागी असलेले दोन्ही गट पंढरपूरच्या वाखरी गावातीलच आहेत. या घटनेमुळे स्थानिक परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून तिघे जण ताब्यात घटनेची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पिस्तूल जप्त केले असून, सुरज पवार यांच्यासह तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या गोळीबारात नेमका कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलिस करत आहेत. सध्या पोलिसांनी आरोपींची नावे जाहीर केलेली नाहीत. नर्तिकेच्या प्रेमात माजी उपसरपंचांने संपवले जीवन जिच्यासाठी जीव ओवाळून टाकला ती संपर्कातही राहीना म्हणून सासुरे (ता.बार्शी) येथे तिच्या घरासमोर येऊन चक्क पिस्तुलाने गेवराई तालुक्यातील विवाहित माजी उपसरपंच तरुणाने कारमध्ये स्वतःच्या डोक्यात गोळी मारून घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली. गोविंद जगन्नाथ बर्गे ( ३४, रा.लुखामसला, ता.गेवराई) असे मृताचे आहे. दुष्कर्माचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन पैशासाठी नर्तिका पूजा देविदास गायकवाड (२१, रा. सासुरे ता. बार्शी जि सोलापूर ) हिने वारंवार तगादा लावल्याची तक्रार गोविंद यांचे मेहुणे लक्ष्मण जगन्नाथ चव्हाण (रा .नंदापूर, जि . जालना) यांनी वैराग पोलिसात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला असून पूजा गायकवाड हिला ताब्यात घेतले आहे. सविस्तर वाचा...
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/afo1GVd
माढ्यातील 'जय मल्हार कला केंद्रा'बाहेर गोळीबार:एक जण जखमी, तिघे ताब्यात; एकच बैठक लावण्यावरून घडली घटना
September 10, 2025
0