महाराष्ट्र सरकारने 'महाराष्ट्र बाईक-टॅक्सी नियम, 2025' अंतर्गत राज्यात इलेक्ट्रिक दुचाकी टॅक्सींसाठी भाडेदर निश्चित केले आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली असून, मोटार वाहन अधिनियम, 1988 च्या कलम 73 आणि 96 नुसार शासनाला मिळालेल्या अधिकारांचा वापर करून हा निर्णय घेण्यात आला आहे. हे नवीन दर तातडीने लागू होणार आहेत. असे असतील भाडेदर परिवहन मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार, इलेक्ट्रिक दुचाकी टॅक्सींसाठी प्रति किलोमीटर 10.27 रुपये भाडे आकारले जाईल. यात पहिला 1.5 किलोमीटरचा टप्पा अनिवार्य असून, त्यासाठी किमान भाडे 15 रुपये असेल. त्यामुळे, प्रवास कितीही कमी असला तरी प्रवाशांना किमान 15 रुपये द्यावे लागतील. त्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी 10.27 रुपये दर लागू होईल, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाने तीन मोठ्या कंपन्यांना, म्हणजेच मे. उबेर इंडिया सिस्टीम्स प्रा. लि., मे. रॅपिडो ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रा. लि. आणि मे. अॅनी टेक्नॉलॉजीज प्रा. लि., 'मुंबई महानगर क्षेत्रासाठी तात्पुरता परवाना' मंजूर केला आहे. या परवान्याची मुदत 30 दिवसांची असून, त्यानंतर त्यांना अंतिम परवान्यासाठी अर्ज करणे बंधनकारक असेल. तात्पुरत्या परवान्यातील सर्व अटी व शर्ती मान्य केल्यानंतरच या कंपन्यांना पुढील परवाना दिला जाईल. या निर्णयामुळे प्रवाशांना स्वस्त, सोयीस्कर व पर्यावरणपूरक प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. इलेक्ट्रिक दुचाकी टॅक्सींच्या माध्यमातून वाहतुकीवरील ताण कमी होऊन, प्रदूषणाला आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे. भाडे असे आकारले जाईल राज्यात इलेक्ट्रिक दुचाकी टॅक्सींसाठी किमान भाडे हे 15 रुपये असणार आहे. त्यानंतर प्रति किलोमीटर 10.27 रुपये शुल्क लागेल. सध्या उबेर, रॅपिडो आणि अॅनी टेक्नॉलॉजीज या तीन कंपन्यांना मुंबई महानगर क्षेत्रात प्रायोगिक तत्वावर सेवा सुरू करण्यासाठी तात्पुरता परवाना देण्यात आला आहे. या कंपन्यांना 'महाराष्ट्र बाईक-टॅक्सी नियम, २०२५' अंतर्गत इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सेवा चालवण्यास परवानगी मिळाली आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/uTgBamN
राज्यात इलेक्ट्रिक दुचाकी टॅक्सींसाठी भाडेदर निश्चित:नवीन दर तातडीने लागू होणार, प्रति किमी किती आहेत दर? वाचा सविस्तर
September 15, 2025
0