बदलत्या काळात तरुण व तरुणी यांचे नाेकरीचे प्रमाण वाढलेले असून करिअरला महत्व दिले जात असल्याने लग्नाचे देखील वय वाढू लागले आहे. त्यातच लिव्ह इन रिलेशनशीप मध्ये राहण्याचा ट्रेंड देखील आता बदलला गेला असून आता ‘डिंक कपल’चा (डयुल इनकम नाे कीडस) ट्रेंड’ वाढत असल्याचे पाहावयास मिळत आहे. नाेकरी किंवा व्यवसाय करणारी जाेडपी लग्नानंतर कुटुंब नियाेजनाचा काेणताही विचार करत नाही. त्यांच्यासाठी ‘डिंक’ या शब्दाचा वापर करण्यात येताे. मदरहुड हाॅस्पिटल्स आणि नाेव्हा आयव्हीएफ फर्टिलिटीने देशभरातील विविध शहरात जाऊन ‘जेन-झी’ पिढीमध्ये त्यांच्या प्रजनन आराेग्याचे नुकतेच सर्व्हेक्षण केले. यामध्ये डिंक कपलचा वाढता ट्रेंडमुळे प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम हाेत असल्याचे आणि १८ टक्के जेन-झी महिलांनी मुल न हाेऊ देण्याचा निर्णय घेतल्याचे वास्तवदेखील समाेर आले. शिवाय ३५ वर्षे वयानंतरच्या प्रजनन क्षमतेत लक्षणीयरित्या घट हाेत असल्याचे देखील सर्व्हेक्षणात निर्देशनास आले. विविध व्यावसायिक पार्श्वभूमी असलेल्या २३ ते ३० वयाेगटातील २००हून अधिक ‘जेन-झी’ महिला या सर्व्हेक्षणात सहभागी झाल्या हाेत्या. देशातील अर्धापेक्षा अधिक ‘जेन-झी’ महिलांना ३५ वयानंतर प्रजनन क्षमता लक्षणीयरित्या कमी हाेते असे वाटत आहे. ३५ वर्षानंतर प्रजनन क्षमतेत लक्षणीय घट हाेत असून ४१ टक्के महिला प्रजनन क्षमेतचा प्राथमिक स्त्राेत म्हणून साेशल मीडियाचा वापर करत आहेत. सर्व्हेक्षणात सहभागी महिलांना गर्भधारणेचे याेग्य वय विचारल्यावर २५ टक्के महिलांंनी गर्भधारणेसाठी वयाच्या पस्तीशीच्या अता गर्भधारणा हाणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. महिलांमधील प्रजनन क्षमता दर्शवणारे एएमएच चाचणीबाबत ६५ टक्के महिलांना फारशी माहिती नाही. तर ५६ टक्के महिलांना एग फ्रीझिंगबद्दल पुरेशी कल्पना नाही. दहा टक्के लाेक जग भ्रमंती, करिअर, याेग्य जाेडीदार न मिळणे आर्थिक स्थिरता यासाठी या पर्यायचा प्राधान्याने विचार करत आहेत. लग्नास उशीर झाल्याने गर्भधारणेचे वयदेखील वाढत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. महिलांमध्ये एएमएच पातळीत घट पुण्यातील फर्टिलिटी तज्ञ डाॅ.रश्मी निफाडकर म्हणाल्या, सर्व्हेक्षणाचे माध्यमातून २० ते ३० वयाेगटातील महिलांमध्ये एएमएच पातळीत घट दिसून येते. २७ टक्के महिला आर्थिकदृष्ट्या स्थिरावण्याकरिता गर्भधारणेस विलंब करतात. वंध्यत्वाचा परिणाम स्त्री व पुरुष या दाेघांवर समप्रमाणात हाेताे. महिलां मधील वंधत्वा प्रमाणेच पुरुषांमधील वंध्यत्व देखील गर्भधारणेत अडथळा निर्माण करते. प्रतिबंधात्मक आराेग्य तपासणी म्हणून नियमित प्रजनन चाचणी करणे गरजेचे आहे. घात सवयी टाळण्याची गरज जीवनशैलीची महत्वपूर्ण भूमिका बेंगळुरुच्या फर्टिलिटी तज्ज्ञ डाॅ.शर्वरी मुंढे म्हणाल्या, सर्व्हेक्षणात असे देखील दिसून आले की, २० टक्के महिलां मध्ये थायराॅईड, एंडाेमेट्रिओसीस, पीसीओएस सारख्या आजारांचे निदान झाले आहे. परंतु त्यानंतरही त्यांना वैद्यकीय मदत घेण्याची चिंता भासत नाही. हदयाच्या आराेग्या प्रमाणेच प्रजनन आराेग्यातही जीवनशैली खूप महत्वाची भूमिका बाजवते. अल्काेहाेल, धूम्रपान टाळणे, केवळ शिजवलेले अन्न खाणे, जंकफूड टाळणे, व्यायाम करणे, सकस आहार घेणे महत्वपूर्ण आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/7JUjVAB
‘जेन-झी’ पिढीचे देशव्यापी सर्वेक्षण:‘डिंक कपल’च्या वाढत्या ट्रेंडमुळे प्रजनन क्षमतेवर परिणाम
September 02, 2025
0