Type Here to Get Search Results !

आई-वडिलांपासून वेगळे राहण्यासाठी पत्नीचा दबाव; पतीची पुण्यात आत्महत्या:आत्महत्येस प्रवृत्त केल्यावरून पत्नीसह तिच्या आईविरुद्ध येरवड्यात गुन्हा

लग्नानंतर ६ महिन्यातच पत्नीच्या सततच्या त्रासामुळे पतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना येरवडा परिसरात घडली. पोलिसांनी याबाबत तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पत्नीसह तिच्या आईविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अक्षय विजय साळवे (२६, रा. गणेशनगर, येरवडा,पुणे) असे आत्महत्या केलेल्या मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याची पत्नी दीपाली अक्षय साळवे (२४), तिची आई संगीता अशोक अडागळे (रा. भगवाननगर, गेवराई, जि. बीड) यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत मयत अक्षय याची आई लक्ष्मी विजय साळवे (वय ५२) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षयचा दीपालीशी ६ महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. विवाहानंतर दीपाली आणि तिची आई संगीता यांनी अक्षयला आई-वडिलांपासून वेगळे राहण्यास वेळोवेळी सांगितले. त्याने वेगळे राहण्यासाठी त्याच्यावर सतत दबाब आणला. त्याच्याविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात तक्रारी देखील दिल्या. पत्नी आणि सासूच्या त्रासामुळे अक्षयने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पत्नी आणि सासूच्या त्रासामुळे मुलगा अक्षयने आत्महत्या केल्याचे त्याची आई लक्ष्मी साळवे यांनी फिर्यादीत सांगितले आहे. पोलिस उपनिरीक्षक एस दळवी पुढील तपास करत आहेत. दरम्यान, पुण्यात गेल्या काही महिन्यांत अशा प्रकारच्या अशा घटनांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. गेल्या महिन्यातही अशाच प्रकारे एकाने पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येते. अशा घटना रोखण्यासाठी पोलिसांसह सामाजिक संघटनांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/m75NITp

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.