मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्यानंतर प्रथमच सातारा येथे आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य असलेले महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचे सातारच्या पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात सकल मराठा समाज बांधव व बहिणींनी उत्स्फूर्त असे स्वागत केले. त्यावेळी बोलताना शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी केवळ आणि केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच मराठा समाजाला हे आरक्षण मिळाल्याचे स्पष्ट केले. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात एक जीआर काढला. व मराठा समाजाचे आरक्षण मिळण्याचा मार्ग खुला झाला या पार्श्वभूमीवर नामदार विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य असलेले शिवेंद्रसिंहराजे भोसले हे आज सातारा येथे संध्याकाळी आले. त्यावेळी त्यांचे पोवई नाक्यावर उस्फुर्त असे स्वागत मराठा समाजातील बंधू-भगिनींनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर शिवाजी महाराजांच्या व संभाजी महाराजांच्या जयजयकाराच्या घोषणा उपस्थितांनी दिल्या. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले उपस्थित होते. यावेळी बोलताना शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी आपण जो माझा सत्कार केला आहे तो मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने स्वीकारतो कारण याचे श्रेय हे फक्त आणि फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच आहे हे सांगायलाही ते विसरले नाहीत . मराठा समाजाला आता कायदेशीर रित्या आरक्षण मिळाल्याचे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/g5qnbFE
मराठा समाजाला आरक्षण केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच:शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची स्पष्टोक्ती, साताराच्या पोवई नाक्यावर सभा
September 04, 2025
0