पालघर जिल्ह्याला हादरवून टाकणारी एक भयानक घटना समोर आली आहे. लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने एका नराधमाने आपल्याच होणाऱ्या बायकोची निर्घृण हत्या केली आहे. या घटनेने बिबलधर गावात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पालघरमधील बिबलधर गावातील पीडित तरुणीचे आई-वडील शेतात कामासाठी गेले होते. ती घरात एकटीच असताना, तिचा होणारा नवरा तिथे आला. त्याने तिच्यावर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला, मात्र तिने त्याला स्पष्टपणे नकार दिला. यामुळे संतप्त झालेल्या आरोपीने तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर गळा दाबून तिची हत्या केली. आईने तक्रार दाखल केली, आरोपी अटकेत घडलेल्या घटनेनंतर आरोपी गावाजवळील जंगलात पळून गेला. संध्याकाळी मुलीचे कुटुंबीय घरी परतल्यावर त्यांना मुलगी मृतावस्थेत आढळली. मुलीच्या आईने तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत काही तासांतच आरोपीला ताब्यात घेतले. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. लिव्ह-इन पार्टनरच्या प्रियकराची निर्घृण हत्या दोन दिवसांपूर्वी पालघर जिल्ह्यातील बोईसरमध्ये एका लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या व्यक्तीने आपल्या महिला जोडीदाराच्या प्रियकराची क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून, नंतर धारदार शस्त्राने भोसकून ही हत्या करण्यात आली. घटनेनंतर आरोपी, महिला आणि तिच्या मुलासह फरार झाले आहेत. नेमके काय घडले? तारापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पास्थल येथील बालाजी कॉम्प्लेक्समध्ये सुरेंद्रसिंह हा गेल्या काही वर्षांपासून रेखा सिंह आणि तिच्या आठ वर्षांच्या मुलासोबत राहत होता. दरम्यान, रेखाची हरीश सुखाडी नावाच्या तरुणाशी ओळख झाली आणि त्यांच्यात जवळीक वाढली. या प्रेमसंबंधाची माहिती सुरेंद्रला मिळताच तो संतापला. त्याने रेखाकरवी हरीशला काही बहाण्याने घरी बोलावले. हरीश घरात आल्यानंतर सुरेंद्रने त्याच्या डोळ्यात अचानक मिरची पूड टाकली. यानंतर त्याने हरीशला मारहाण करून त्याच्या पोटात धारदार चाकू भोसकला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या हरीशचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर आरोपी सुरेंद्र, रेखा आणि त्यांचा मुलगा यांनी घराला कुलूप लावले आणि ते फरार झाले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/q6BDONc
पालघर हादरले:लग्नापूर्वी शारीरिक संबंधांना नकार, होणाऱ्या नवऱ्यानेच अत्याचार करत केली तरुणीची हत्या, आरोपी अटकेत
September 06, 2025
0