सरकारी शाळेत जास्तीत जास्त मुलांनी शिक्षण घ्यावे म्हणून त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील गोगाव ग्रामपंचायतीने अनोखा उपक्रम सुरू केला आहे. जिल्हा परिषद शाळेत म्हणजेच सरकारी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना ग्रामपंचायत करात ५०% सूट मिळणार आहे. गोगांव जिल्हा परिषदेच्या शाळेत अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा आणि गावातील शिक्षणाचा स्तर उंचावावा, हा ग्रामपंचायतीचा उद्देश आहे. सध्या या शाळेत ६३ विद्यार्थी शिकत आहेत, तर गावात सुमारे ५०० कुटुंबे राहतात. या कुटुंबांना वार्षिक ३००० रुपयांचा वार्षिक कर भरावा लागतो. सरपंच वनिता सुरवसे आणि उपसरपंच कमलाकर सोनकांबळे यांच्या पुढाकारातून हा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामपंचायतीकडून रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांही दंड आकारण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. वेळेवर कर भरणाऱ्यांना मिळणार १०% सवलत एप्रिलमध्ये जे लोक कर भरतील त्यांनाही अतिरिक्त १०% सूट मिळेल. करातून मिळणाऱ्या एकूण उत्पन्नाच्या ५% रक्कम दिव्यांगांना आर्थिक साहाय्य आणि त्यांच्या सामाजिक उन्नतीवर खर्च करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/mRlMgaW
गोगावमध्ये निर्णय- सरकारी शाळेत मुलाला शिकवल्यास अर्धा कर माफ:साक्षरता वाढीसाठी सोलापूर जिल्ह्यातील गावाचे पाऊल
September 07, 2025
0