Type Here to Get Search Results !

नागपुरात भाेसलेंच्या मस्कऱ्या गणपतीची उद्या स्थापना:कुळाचारी गणपतीचे विसर्जन होऊन गेल्याने केली स्थापना, नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती

इ. स. १७८७ मध्ये श्रीमंत राजे खंडोजी महाराज भोसले (ऊर्फ चिमणाबापू) यांनी मस्कऱ्या (हाडपक्या) या उत्सवाचे आयोजन केले होते. या गणपतीचे उद्या मंगळवार, ९ सप्टेंबर रोजी आगमन होणार असून बुधवारी १० सप्टेंबर रोजी स्थापना करण्यात येणार आहे. यावर्षी या गणपतीला २३८ वर्षे पूर्ण होत आहेत. श्रीमंत राजे खंडोजी महाराज भोसले उपाख्य चिमणाबापू यांनी १७८७ मध्ये सुरू केलेल्या हाडपक्या म्हणजेच मस्कऱ्या गणपतीची परंपरा आजही सुरू असून बुधवार, १० सप्टेंबरला या गणेशाची स्थापना होणार अाहे, अशी माहिती राजवाड्याकडून देण्यात आली. समशेर बहादर चिमणाबापू बंगालच्या स्वारीवर होते. बंगालवर विजय मिळवून परत येत असताना घरच्या कुळाचारी गणपतीचे विसर्जन होऊन गेले होते. बंगालच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी म्हणून या मस्कऱ्या गणपतीची स्थापना करण्यात आली. यात विविध नकला, लावण्या, खडी गंमतसारखे कार्यक्रम आयोजित केले जात. कालांतराने लोकमान्य टिळकांनी भोसले महाराजांच्या या घरगुती गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. उत्सवाला २०० वर्षे पूर्ण झाली. तेव्हापासून श्रीमंत राजे मुधोजी महाराज भोसले यांनी उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करणे सुरू केले. यावर्षी उत्सवाला २३८ वर्षे पूर्ण होत आहेत. काही वर्षांपर्यत १८ हातांची २१ फुटांची मूर्ती स्थापन करण्यात येत होती. या वर्षीही १८ हातांची ५ फुटांची मूर्ती स्थापन करण्यात येणार आहे. श्रीमंत राजे खंडोजी महाराजांनी पितृपक्षात मस्कऱ्या (हाडपक्या) गणपतीची सुरू केलेली ही परंपरा आजपर्यंत कायम आहे. श्रीमंत राजे मुधोजी महाराज भोसले हे महाराजा ऑफ नागपूर ट्रस्टच्या व्यवस्थापनात हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतात. हा नवसाला पावणारा गणपती आहे. आजही भक्तांना प्रचिती येते, असा दावा राजवाड्याकडून करण्यात येतो. अाज सायंकाळी ६ वाजता अागमन िमरवणूक गणपतीची आगमन मिरवणूक ९ सप्टेंबरला सायंकाळी ६ वाजता सी. पी. अँड बेरार महाविद्यालय, तुळशीबाग येथून मार्गक्रमण करून गुजर वाडा, ज्युनियर भोसला पॅलेस, राजे प्रतापसिंह भोसले चौक, (सुतिकागृह), कोतवाली पोलिस स्टेशन चौक, नरसिंग टॉकीज चौक व सीनियर भोसला पॅलेसमार्गे राजवाड्यात येईल. नागपूर शहरातील नागरिकांनी गणेशोत्सवात सहभागी व्हावे, असे अावाहन राजवाड्याने यावेळी केले आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/aNAVMOE

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.