उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सोमवारी (८ सप्टेंबर) संत एकनाथ रंगमंदिरात शिवसेनेचा पदाधिकारी मेळावा पार पडला. शिंदे यांच्या भाषणानंतर त्यांना भेटण्यासाठी शिवसैनिकांनी एकच गर्दी केल्याने प्रचंड रेटारेटी झाली. यामुळे शिंदेंनी काढता पाय घेतला. बाहेर पडताना काही शिवसैनिकांनी त्रागा करत दरवाजाच्या काचा फोडल्या. आमदार प्रा. रमेश बोरनारे, संजना जाधव, पालकमंत्री संजय शिरसाट, माजी आमदार कैलास पाटील, माजी महापौर त्र्यंबक तुपे, राजेंद्र जंजाळ आदी सर्वांनीच शिवसेनेच्या बालेकिल्ल्यावरील भगवा ध्वज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही फडकवत ठेवण्याचा संकल्प केला.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/XUzd5Q3
संभाजीनगरात शिंदेंच्या कार्यक्रमात रेटारेटी, रंगमंदिराच्या काचा फोडल्या:उपमुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी शिवसैनिकांनी गर्दी केल्याने उडाला गोंधळ
September 08, 2025
0