Type Here to Get Search Results !

सरन्यायाधीश गवई यांच्या दिशेने जोडा फेकण्याचा प्रयत्न:अंनिससह अनेक संघटनांकडून अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

अमरावती येथे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने जोडा फेकून मारण्याच्या प्रयत्नाचा दुसऱ्या दिवशीही तीव्र निषेध करण्यात आला. प्रा. श्याम मानव यांच्या नेतृत्वाखालील अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि जनसांस्कृतिक चळवळीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने केली. आंदोलनाच्या शेवटी अप्पर जिल्हाधिकारी गोविंद दानेज यांना निवेदन सादर करण्यात आले. या आंदोलनात युनायटेड फोरम, राष्ट्रसेवा दल, संविधान संवाद समिती, जनसांस्कृतिक मंच, जाणिव प्रतिष्ठान, संभाजी ब्रिगेड, विदर्भ जनआंदोलन समिती, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ह्युमन फाउंडेशन, बहुजन संघर्ष समिती, राणी दुर्गावती बहुउद्देशीय सामाजिक संस्था, प्रगतीशील लेखक संघ, टीचर्स डेमोक्रेटिक फ्रंट, शिक्षक भारती, युवा बेरोजगार पदवीधर संघटना महाराष्ट्र, क्रांतिकारी शेतकरी संघटना आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार मंच यासह अनेक संघटना सहभागी झाल्या होत्या. अमरावती शहर आणि जिल्ह्यातील सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. हा हल्ला म्हणजे लोकशाही स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या मूल्यांचा समावेश असणाऱ्या भारतीय संविधानावर आघात असल्याचे आंदोलकांनी म्हटले. या हल्ल्याचा तीव्र शब्दांत जाहीर निषेध व्यक्त करत, सनातनी हल्लेखोर वकील राकेश तिवारी यांना तात्काळ अटक करून कठोर कार्यवाही करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी डॉ. अलीम पटेल, प्रा. संदीप तडस, अशोकराव वाकोडे, राजेंद्र आगरकर, कुमुदिनी वाडेकर, प्रभाकर कडू, भीमराव विडुळकर, मुकुंद काळे, डॉ. लाभीश साबळे, नीळकंठ ढोके, सुनील घटाळे, प्रभाकरराव आकोटकर, माधव गिरी, कपिल पडघाण, महेश देशमुख, प्रकाश कळसकर, प्रा. संतोष शुक्ला, हरीश केदार, प्रा. मनीष पाटील, गणेश गहूकर, रवींद्र चव्हाण, विवेक वाडेकर, पंकज देशमुख, विठ्ठल हिवसे, प्रा. शरद पुसदकर, किरण गुडधे, ॲड. सुयोग माथुरकर, डॉ. प्रकाश मानेकर, प्रदीप पाटील, पद्माकर डोंगरे, प्रा. रवींद्र खंडारे, आशिष कडू, राजाभाऊ गुडधे, धर्मेंद्र भंडारकर आणि मधुकरराव कोडमेथे आदी उपस्थित होते.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/iCmzOHa

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.