Type Here to Get Search Results !

BMC च्या मैदानात जैन मुनींचा नवीन पक्ष:‘शांतिदूत’च्या स्थापनेचे काय आहे गणित? शिंदेंनी BJP ला मात देण्यासाठी नवा पक्ष मैदानात आणला काय? तज्ज्ञांना काय वाटते?

महाराष्ट्रात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा फड रंगणार आहे. त्यामुळे सध्या सत्ताधारी व विरोधक हे दोघेही आपापली रणनीती आखण्यात व्यस्त आहेत. कालांतराने ते एकमेकांवर राजकीय चिखलफेक करून या निवडणुकीत रंगतही आणतील. पण तिकडे मुंबईत 'शांतिदूत जनकल्याण पार्टी' नामक एका नव्या पक्षाचा जन्म झाला आहे. यामुळे पक्षाने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आपले उमदेवार उतरवण्याची घोषणा केली आहे. एका जैन मुनीने हा पक्ष स्थापन केला आहे. पण यामुळे या निवडणुकीतील सर्वच राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चला तर मग या पक्षाच्या स्थापनेमागील राजकीय गणित समजावून घेण्याचा प्रयत्न करू या. जैन मुनी नीलेशचंद्र यांनी शनिवारी आयोजित एका पत्रकार परिषदेत 'शांतिदूत जनकल्याण पार्टी' या नवीन पक्षाची घोषणा केली. आपला पक्ष मुंबई महापालिकेची निवडणूक पूर्ण ताकदीने लढवेल, असे ते म्हणालेत. एकीकडे, उद्धव ठाकरे आपला बालेकिल्ला राखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे भाजप ठाकरेंचा हा बालेकिल्ला सर करण्यासाठी आकाश - पाताळ एक करत आहे. त्यातच जैन मुनींच्या या नव्या पक्षाची एन्ट्री झाल्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक अधिकच अतितटीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जैन मुनी नीलेशचंद्र यांनी स्पष्ट केले की, जैन समाजाचे प्रतीक 'शांतिदूत कबुतर' आहे आणि जे या शांतिदूताच्या विरोधात आहेत, त्यांच्याशी आपला वाद आहे. त्यांनी जाहीर केले की, हा केवळ जैन समाजाचा पक्ष नाही. आमचा पक्ष मुंबईतील मारवाडी व गुजराती समाजाला एकत्र घेऊन मुंबई महापालिकेची निवडणूक लढवेल. भाजप कार्यकर्त्यांचा 'स्वबळाचा' आग्रह, महा-युतीत दबावतंत्र सध्या सर्वच राजकीय पक्ष मुंबई मनपावर आपला झेंडा फडकवण्याचा दावा करत आहेत. भाजपकडून कार्यकर्त्यांची भावना स्वबळावर निवडणूक लढवण्याची आहे, तर महायुतीचे नेते एकत्र लढण्याच्या भूमिकेत आहेत. परंतु, महायुतीमधील प्रत्येक पक्ष आपल्या जागा वाढवून घेण्यासाठी दबावतंत्राचा वापर करताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर, छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. पदाधिकारी स्वबळावर लढण्यास इच्छुक असले तरी, मुख्यमंत्र्यांचा कल मात्र महायुतीच्या बाजूने असल्याचे बोलले जात आहे. 'स्टंट' की 'शिंदेंचा दबाव गट'? ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय अभ्यासक राजेंद्र साठे यांनी या नव्या पक्षाच्या घोषणेकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले आहे. ते म्हणाले की, जैन मुनींचा समाजावर किती प्रभाव पडेल हे सांगणे कठीण आहे. मुंबईतील जैन समाजाला व्यापार-धंदा सोडून मतदानात किती रस असेल, तसेच 'पशूंचा मुद्दा' मुंबई निवडणुकीत प्रभावी ठरू शकणार नाही. साठे यांनी या घोषणेमागे निवडणुकीच्या अनुषंगाने मुद्दा हायलाइट करण्याचा प्रयत्न असू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली. तसेच, ही घोषणा म्हणजे भाजपवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न असू शकतो, असाही अंदाज त्यांनी वर्तवला. मते कापण्यासाठी उतरवल्याची शक्यता ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय अभ्यासक राजेंद्र साठे म्हणाले की, 'एकनाथ शिंदे यांनी भाजपची मते कापण्यासाठी जैन मुनींना मैदानात उतरवले असण्याची दाट शक्यता आहे. भाजपच्या जागा कमी व्हाव्यात आणि त्यांना आपली गरज भासावी असे शिंदेंना वाटते. हे अधिक स्पष्ट करून सांगताना साठे पुढे म्हणतात, मारवाडी, राजस्थानी आणि व्यापारी वर्ग हा भाजपला सोडून इतर पक्षाकडे जाणार नाहीत. भाजपने पीयूष गोयल यांना मुंबईतून उमेदवारी देऊन या समाजाला आपलेसे केले आहे. हा वेगळा पक्ष काढणे म्हणजे 'संपूर्ण स्टंट' आहे आणि याचा भाजपला मोठा तोटा होणार नाही. निवडणुका प्रत्यक्षात व्हायला वेळ आहे आणि तोपर्यंत अनेक गोष्टी बदलतील; सध्याची घोषणा केवळ दबावतंत्राचा एक भाग आहे,' असे साठे यांनी स्पष्ट केले. 2017 च्या मुंबई मनपा निवडणुकीनंतर 2017 ते 2022 या काळात शिवसेनेचे संख्याबळ वाढले होते. पक्ष निवडून आलेले नगरसेवक (2017) सध्या भाजप अन् उद्धव ठाकरेंकडेच सर्वाधिक माजी नगरसेवक निवडणुकीनंतर 4 अपक्षांनी शिवसेनेला साथ दिली आणि मनसेचे 6 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यासोबत 2022 पर्यंत आणखी 5 नगरसेवकांनी शिवसेनेला साथ दिली आणि शिवसेनेचे संख्याबळ 99 पर्यंत गेले. आणि शिवसेना हा मुंबई मनपा निवडणुकीत नंबर एकचा पक्ष झाला. त्याखालोखाल भाजपकडे 82 नगरसेवक होते ही संख्या 2012 च्या निवडणुकीत केवळ 31 होती. विधानसभा निवडणुकीनंतर आगामी महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार तयारीला देखील सुरुवात केली आहे. महायुतीच्या नेत्यांनी यावेळी मुंबई पालिकेवर सत्ता मिळवण्याचा निर्धार केला आहे. तर शिवसेना ठाकरे गटानं देखील पुन्हा आपलीच सत्ता येणार असल्याचा दावा केला आहे. शिवसेनेच्या 99 पैकी 44 ते 45 नगरसेवक हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. तर जवळपास 50 ते 55 नगरसेवक हे उद्धव ठाकरेंसोबत आहेत. या आराखड्यानुसार मुंबई महापालिकेची एकूण लोकसंख्या 1 कोटी 24 लाख 337 असून ही लोकसंख्या मुंबई महापालिकेच्या 227 प्रभागांमध्ये विभागली गेली आहे. तर 2017 मध्ये मुंबई मनपासाठी एकूण 91 लाख 80 हजार 653 मतदार होते.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/xtsgh41

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.